फतवे काढणाऱ्यांना न्यायालयाची चपराक

रुबिना पटेल, मुस्लिम महिला मंचाच्या अध्यक्षा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयालाने तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, फतवे काढणाऱ्या मौलवी, हुरियत यांना चपराक बसणार आहे. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. २२ इस्लामिक देशांत तोंडी तलाकवर बंदी आहे. तोंडातून एकदा जरी तलाक हा शब्द निघाल्यानंतर तलाक होऊन महिला हराम समजल्या जात असल्याची तरतूद कुरआनमध्ये नाही. याऊपरही मौलवींद्वारे असे फतवे काढले जायचे. आता मात्र याला चाप बसला आहे. या विषयाचा राजकीय मुद्दा म्हणून उपयोग व्हायला नको. 

तलाकच्या विरोधात आम्ही २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. या निर्णयामुळे बहुतांश मुस्लिम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी परंपरावादी महिलांचा या निर्णयाला विरोध असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. हिंदू कोड बिल आले त्या वेळीदेखील हिंदूंनीच विरोध केला होता. नवा कायदा अस्तित्वात येताना पितृसत्ताक संस्कृती मानणाऱ्या मुस्लिम महिलांचा विरोध होण्याची दाट शक्‍यता आहे. पितृसत्ताक संस्कृतीची गुलामी जोवर मुस्लिम महिला सोडणार नाही, तोवर कायद्याचा फायदा होणार नाही.

Web Title: triple talaq muslim women Supreme Court rubina patel