त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली, स्वतः PM मोदी राहणार उपस्थित Tripura New Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tripura Government Formation

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली, स्वतः PM मोदी राहणार उपस्थित Tripura New Government

8 मार्च रोजी त्रिपुरामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण ६० पैकी ३२ जागा जिंकल्या आहेत, तर त्यांचा मित्रपक्ष आयपीएफटीने एक जागा जिंकली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा रविवारी (५ मार्च) दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

येथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत त्रिपुरासह नागालँड आणि मेघालयच्या शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा होऊ शकते.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी (३ मार्च) आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की नवीन सरकार 8 मार्च रोजी शपथ घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येथील विवेकानंद मैदानावर होणार आहे.

त्रिपुरामध्ये, भाजप-आयपीएफटी युतीने 60 पैकी 33 (एक मित्र पक्ष) जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. प्रद्योत किशोर देबबर्मा यांच्या टिपरा मोथा पक्षाला 13 जागा मिळाल्या, तर डाव्या-काँग्रेस आघाडीला 14 जागा मिळाल्या.

देबबर्मा यांच्या पक्षाने आदिवासी भागात डाव्यांच्या मतांमध्ये घसरण केली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब होती. टीएमसीने 28 जागांसाठी उमेदवार उभे केले मात्र एकाही उमेदवाराला कुठेही यश मिळाले नाही. TMC च्या मतांची टक्केवारी (0.88 टक्के) NOTA पेक्षा कमी होती.

टॅग्स :Narendra Modi