त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी बजावला समन्स

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

शासकीय नोकऱ्यांसाठी राजकीय नेत्यांच्या मागे न पळता त्याऐवजी पान टपरी टाका असेही विधान कुमार यांनी नुकतेच केले. तसेच गायी पाळून डेअरी व्यवसाय वाढवण्याबातचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. 

गुवाहाटी : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समन्स बजावला आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विप्लव कुमार देव यांना समन्स बजावून 2 मे ला दिल्ली येथे भेटीसाठी बोलावले आहे.

विप्लव कुमार देव यांनी नुकताच त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला आहे. तेव्हापासून त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. इंटरनेट व सॅटेलाईट हे महाभारताच्या काळापासून आहे, तसेच विश्वसुंदरी डायना हेडन ही कोणत्या पात्रतेने विश्वसुंदरी झाली, त्यावेळची स्पर्धा ही फिक्स होती का असे वादग्रस्त प्रश्न कुमार यांनी केले. तसेच मेकॅनिकल इंजिनीअर हे नगरी सेवांमध्ये येऊ शकत नाहीत, तर केवळ सिव्हील इंजिनीअर येऊ शकतात असे वक्तव्यही त्यांनी केले. 

शासकीय नोकऱ्यांसाठी राजकीय नेत्यांच्या मागे न पळता त्याऐवजी पान टपरी टाका असेही विधान कुमार यांनी नुकतेच केले. तसेच गायी पाळून डेअरी व्यवसाय वाढवण्याबातचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. 

गेले काही दिवस विप्लप हे काहीही व कोणत्याही प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, त्यासंबंधी पंतप्रधान त्यांच्याशी बोलतील, असे भाजप नेत्यांनी माध्यमांना, सांगितले.  

Web Title: tripura chief minister summoned by prime minister narendra modi