मोदींसमोर मंत्र्याने महिलेला 'नको' तिथे लावला हाथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

अगरतळाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर एका कार्यक्रमादरम्यान त्रिपुराच्या एका मंत्र्याने मंत्री असलेल्या महिलेला नको तिथे हाथ लावला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

अगरतळाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर एका कार्यक्रमादरम्यान त्रिपुराच्या एका मंत्र्याने मंत्री असलेल्या महिलेला नको तिथे हाथ लावला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोदींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटनावेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव व मंत्री मनोज कांती देब मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन होत असताना मनोज कांती देब यांनी मंत्री असेल्या एका महिला मंत्र्याला नको तिथे हाथ लावला. संबंधित व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका महिला मंत्र्याला नको तिथे अश्लिल पद्धतीने हात लावल्यामुळे विरोधकांनी मंत्री मनोज कांती देब यांच्या बडतर्फ करण्याबरोबरच अटक करण्याची मागणी केली आहे.

वाम मोर्चाचे संयोजक बिजन धर म्हणाले, 'मनोज कांती देब यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व महत्त्वाच्या व्यक्तींसह सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला नको त्या ठिकाणी हाथ लावला आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. युवकांची हत्या होत आहे. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला स्पर्श केला जात आहे. यामुळे मंत्री मनोज कांती देब यांना बडतर्फ करण्याबरोबरच तत्काळ अटक करायला हवी.'

भाजपचे प्रवक्ते नाबेंदू भट्टाचार्य म्हणाले, 'भाजप मंत्र्याविरोधात नको त्या विषयावरून राजकारण केले जात आहे. त्या महिला मंत्र्याची तक्रार नसेल तर तुम्हाला काय अडचण आहे. विरोधक गलिच्छ राजकारण करत आहेत.'

Web Title: Tripura Minister Touches Colleague Inappropriately While on Stage with PM Modi