Tripura Nagaland Meghalaya Election Result: ईशान्येतील 3 राज्यांत आज मतमोजणी; एक्झिट पोलमध्ये त्रिपुरा- नागालँडमध्ये भाजप आघाडीला बहुमत

Tripura Nagaland Meghalaya Assembly Election Result bjp congress
Tripura Nagaland Meghalaya Assembly Election Result bjp congress

ईशान्येकडील तीन राज्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. निकालांसह, तिन्ही राज्यांना त्यांचे नवे मुख्यमंत्री मिळतील. (Tripura Nagaland Meghalaya Assembly Election Result bjp congress)

नागालँड विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपणार आहे. त्याचवेळी, मेघालयातील विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च आणि त्रिपुरामध्ये 22 मार्च रोजी संपत आहे. येथे, मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजप युतीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणजेच त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Live Update: त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडवर कुणाची सत्ता येणार?

2017 पासून पंतप्रधान मोदी यांनी 47 वेळा ईशान्येला भेट दिली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये 3 मोठ्या सभा घेतल्या. दर 15 दिवसांनी एक किंवा दुसरा केंद्रीय मंत्री ईशान्येतील 8 राज्यांमध्ये नक्कीच पोहोचतो. केंद्र सरकारने 2024-25 साठी ईशान्येसाठी 5892 कोटींचे बजेट दिले आहे.

नागालँड विधानसभेसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ६० जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान पार पडलं. येथे १३ लाख मतदार असून, ८२.४२ टक्के मतदान झालं होतं.

मेघालय विधासभेच्या ६० जागांसाठी मतदान पार पडलं आहे. येथे २१.६ लाख मतदान असून, ३६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये ३६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेस आणि अन्य राज्यस्तरीय पक्षांनी या निवडणुकीत मोठी लढत दिली होती.

Crime : करोडपती चोर! लग्झरी कारमधून करत होता रस्त्यावरच्या कुंड्यांची

त्रिपुरात ६० जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान पार पडलं आहे. एकूण २५९ उमेदवारांनी आपलं नशीब या निवडणुकीसाठी आजमावलं होतं. येथे ८१.१ टक्के मतदान झालं. राज्य मुख्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष गित्ते किरणकुमार दिनकारो यांनी सांगितल्यानुसार, ३ हजार ३३७ मतदान केंद्रावर मतदान झालं होतं. यामध्ये ११०० मतदान केंद्र संवेदनशील आणि २८ अतिसंवेदनशील होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com