तर त्रिपुराची छाती 56 इंचाची होईल - विप्लब देव 

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव परत चर्चेत आले आहेत. जर त्रिपुराच्या तरुणांनी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं तर त्रिपुराची छाती 56 इंचाची होईल असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे, नागरिकांचं स्वास्थ्य सुधारेल आणि परिणामी राज्याचं स्वास्थ्य सुधारेल असं ते म्हणाले.

त्रिपुरा - वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव परत चर्चेत आले आहेत. जर त्रिपुराच्या तरुणांनी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं तर त्रिपुराची छाती 56 इंचाची होईल असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे, नागरिकांचं स्वास्थ्य सुधारेल आणि परिणामी राज्याचं स्वास्थ्य सुधारेल असं ते म्हणाले.

सर्व तरुणांनी तंदुरुस्त राहावं, तरुणांनी जर दंडबैठका मारल्या तर ते स्वतः तंदुरुस्त बनतील आणि त्रिपुराही तंदुरुस्त बनेल. त्यामुळे त्रिपुराची छाती आपोआप 56 इंचाची होईल. मी स्वतः क्रीडा मंत्र्यांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे. मी 20 दंडबैठका मारु शकतो, प्रत्येक तरुणाने सकाळी दंडबैठका मारायला पाहिजेत, असंही ते म्हणाले.

महाभारताच्या काळात तांत्रिक सुविधा उपलब्ध होत्या, महाभारत काळापासून इंटरनेट होतं. अशा प्रकारची वादग्रस्त विधाने विप्लब देव यांनी काही दिवसापूर्वी केली होती. 

Web Title: tripura State Will Develop 56 Inch Chest says viplab dev