त्रिपुरात आमदारांनी पळविला राजदंड

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

त्रिपुराचे वनमंत्री नरेश जमातिया यांच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बडतर्फ केलेले एक नेते आरोप करत असताना ही घटना घडली. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि तृणमुलचे आमदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी वर्मन यांनी थेट अध्यक्षांसमोरील राजदंडच पळविण्याचे धाडस केले.

आगरतळा - विधानभवनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गोंधळ घालणारे आमदार आतापर्यंत आपण पाहिले आहेत. पण त्रिपुरा विधानसभेत एका आमदाराने चक्क अध्यक्षांसमोरील राजदंडच पळवून नेल्याची घटना घडली.

तृणमुल काँग्रेसचे आमदार सुदीप रॉय वर्मन असे या आमदाराचे नाव आहे. राजदंड पळवून घेऊन जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागे पळत जाऊन त्यांना पकडले व राजदंड पुन्हा मिळविला. या सर्व प्रकारामुळे विधानसभेत काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी वर्मन यांच्यावर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

त्रिपुराचे वनमंत्री नरेश जमातिया यांच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बडतर्फ केलेले एक नेते आरोप करत असताना ही घटना घडली. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि तृणमुलचे आमदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी वर्मन यांनी थेट अध्यक्षांसमोरील राजदंडच पळविण्याचे धाडस केले. सुदीप वर्मन हे आगरतळा विधानसभा मतदारसंघातून 1998 पासून निवडून येत आहेत.

Web Title: Tripura: TMC MLA runs away with Speaker's mace, stalls house