शेतकरी संपाचा मुद्दा तापणार मंदसौरमध्ये शुक्रवारी श्रद्धांजली सभा 

Trouble raises issue of farmers' agitation Friday in Mandsaur
Trouble raises issue of farmers' agitation Friday in Mandsaur

नवी दिल्ली - मंदसौर (मध्य प्रदेश) येथे शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या संपाचा मुद्दा तापविण्याची रणनीती शेतकरी संघटनांनी आखली आहे. मंदसौरमध्ये राष्ट्रीय किसान महासंघातर्फे शुक्रवारी (ता. 8 ) श्रद्धांजली सभा होणार असून, यात माजी मंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि विश्‍व हिंदू परिषदेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रवीण तोगडिया सहभागी होणार आहेत. 

राष्ट्रीय किसान महासंघातर्फे आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतमालाला दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्तीच्या मागणीचा पुनरुच्चार करताना सात राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही सरकारकडून अद्याप संवादाचा साधा प्रयत्नही झाला नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. महासंघाचे पदाधिकारी व आंदोलनाचे नेते शिवकुमार कक्काजी यांनी सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी महाराष्ट्रात आंदोलनाचे यशस्वी परिणाम झाल्याचा दावा केला. हरियानातील शेतकरी नेते गुरनामसिंह, उत्तर प्रदेशातील नेते हरपालसिंह, केरळमधील नेते पी. टी. जॉन, संतवीर सिंह आदी उपस्थित होते. 

पाकिस्तानी साखर भेट देणार 
मंदसौरच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस गोळीबारात काही शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेला उद्या (ता. 6) एक वर्ष पूर्ण होणार आहे. किसान महासंघातर्फे मंदसौरला आठ जूनला श्रद्धांजली सभा होणार असली, तरी देशाच्या इतर भागांमध्ये उद्याच श्रद्धांजली कार्यक्रम होईल. आठ जूनला देशभरातील शेतकरी आपापल्या जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांना दूध, फळे, भाज्या भेट देतील. पाकिस्तानातून आयात झालेली साखर भाजप नेत्यांना भेट दिली जाईल. नऊ जूनला शेतकरी उपोषण करणार असून, दहा जूनला "भारत बंद' पुकारला जाणार आहे. दहा जूनपर्यंत सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राष्ट्रपतींना भेटून दाद मागितली जाईल आणि दहा जूननंतर देशभरात भाजपची शवयात्रा काढली जाईल, असाही इशारा शिवकुमार कक्काजी यांनी दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com