'टीआरएस'च्या नेत्याची दगडाने ठेचून हत्या

'टीआरएस'च्या नेत्याची दगडाने ठेचून हत्या

हैदराबाद : तेलंगणामध्ये राजकीय संघर्षात तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) नेता नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. विकराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात ही घटना घडली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रेड्डी गट आणि त्यांच्या प्रतिस्पर्धकाच्या गटामध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर उसळलेल्या संघर्षात रेड्डींची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या भागात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, आज (ता.06) मंगळवारी सकाळी नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. रेड्डी यांच्या हत्येची माहिती मिळताच आक्रमक झालेल्या त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे. दोन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com