बिहार: बेकायदा मांस वाहतूक करणारा ट्रक नागरिकांनी पकडला

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुजफ्फरपूरकडे जाणारा ट्रक नागरिकांनी आज (गुरुवार) शाहपूर बाजारात अडविला. ट्रकमधील तीन जणांना त्यांनी बेदम चोप दिला. नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

आरा - बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बेकायदा कत्तलखान्यातून मांस घेऊन जाणारा ट्रक स्थानिक नागरिकांनी जप्त करुन तीन जणांना ताब्यात घेतले.

मुजफ्फरपूरकडे जाणारा ट्रक नागरिकांनी आज (गुरुवार) शाहपूर बाजारात अडविला. ट्रकमधील तीन जणांना त्यांनी बेदम चोप दिला. नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रकमधील अन्य एक जण पळून गेला, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी संजीव कुमार यांनी दिली.

शाहपूर पोलिस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या राणीसागर भागातील बेकायदा कत्तलखान्यातील मांस ट्रकमधून नेले जात होते. दरम्यान, पकडण्यात आलेले मांस कशाचे आहे, पाहण्यासाठी मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.

Web Title: Truck carrying meat seized in Bihar, 3 detained