गायीसाठी टॅंकर चालकाने ब्रेक लावला अन् फिरला 180 डिग्रीत (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

अहमदाबादः गायीचा जीव वाचविण्यासाठी टॅंकर चालकाने आपला जीव धोक्यात घालून ब्रेक दाबला अन् टॅंकर 180 डिग्रीत फिरला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, चालकावर कौतुकाचं वर्षाव होत आहे.

गुजरातमधील जूनागढमध्ये ही थरारक घटना घडली आहे. एक गाय रस्ता ओलांडत असताना टॅंकर वेगात येत होता. परंतु, टॅंकर चालकाने गायीला वाचविण्यासाठी जोरात ब्रेक दाबले. यामुळे टॅंकर 180 डिग्रीत फिरला. सुदैवाने टॅंकर चालक व गाय सुरक्षित राहिले. थरारक व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी टॅंकरचालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

टॅंकरचा वेग पाहता अपघात झाला असता. टॅंकर चालकाने ब्रेक दाबला नसता तर गायीचा जीव गेला असता. शिवाय, ज्या प्रकारे टँकर चालकाने ब्रेक दाबला त्यावेळी टॅंकर पटली होऊ शकला असता. सुदैवाने गाय व चालकही सुखरुप आहे. देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्येय आला.

Web Title: Truck driver shows off insane moves to save a cow at gujrat