ट्रक पलटल्याने दोघे जण जागीच ठार    

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

रायपूर वरुन बंगलोरला सनमाईका घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटला. काल झालेल्या या अपघातात वाहनचालक व क्लीनर जागीच ठार झाले आहेत.

कोरची : तालुक्या पासुन आठ कि मी. अंतरावर पाठदेवाच्या समोर कुरखेडा - कोरची रोडवर छत्तीसगड राज्यातील, रायपूर वरुन बंगलोरला सनमाईका घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटला. काल झालेल्या या अपघातात वाहनचालक व क्लीनर जागीच ठार झाले आहेत. तर वाहन चालकाची ओळख पटली असून राजेंद्र यादव (रा. रायपूर वय 45) आहे, पण क्लीनरची ओळख अजुन पटलेली नाही.

सदर घटना  काल (ता. 25) पाहाटे घडली असून  सी.जी.07 बि.एम.9213 क्रमांकाचा ट्रक छत्तीसगड राज्यातुन येत होता. कोरची-पुराडा मार्गावर बेडगाव पासुन चार कि.मी. अंतरावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटला.

हा अपघात इतका भिषण होता की चालकाचा आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालक वाहनाखाली अक्षरशः दबलयाने चिळकांड्या उडाल्या होत्या. ट्रक मध्ये भरलेल्या सामानाचे खूप मोठे नुकसान झाले असून, पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्राचे पीएसआय पोटे करीत आहेत,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck overturned killing two on the spot