गुजरातमध्ये ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात; 14 ठार

पीटीआय
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

अहमदाबाद - भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 14 जण मृत्युमुखी पडले; तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. अहमदाबाद जिल्ह्यातील वलथेरा पतीया गावाजवळ हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात ढोलका- बगोद्रा महामार्गावर झाला.

राजकोट जिल्ह्यातून भाविकांना घेऊन ही बस आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या ट्रकने या बसला धडक दिली, असे पोलिसांनी सांगितले. अपघातातील सर्व भाविक हे गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील पावागड येथून पुन्हा राजकोटला चालले होते. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरारी झाला असून, आम्ही त्याचा शोध घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखर करण्यात आले आहे.

Web Title: Truck-Van accident in Gujrat; 14 dead