स्थलांतरितांच्या धोरणावर ट्रम्प यांची माघार 

यूएनआय
गुरुवार, 21 जून 2018

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत अमेरिक-मेक्‍सिको सीमेवरील स्थलांतरित कुटुंबांना वेगळे ठेवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याच्या सरकारी आदेशावर आज स्वाक्षरी केली.
 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत अमेरिक-मेक्‍सिको सीमेवरील स्थलांतरित कुटुंबांना वेगळे ठेवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याच्या सरकारी आदेशावर आज स्वाक्षरी केली.

अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांना वेगळे ठेवले जात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरातून ट्रम्प यांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला जात होता. चोहोबाजूंनी टीकेचा सामना करावा लागणाऱ्या ट्रम्प यांनी स्थलांतरित धोरणात बदल करताना या सरकारी आदेशावर सही केली. अमेरिकेत गेल्या काही आठवड्यांत जवळपास अडीच हजार मुलांना त्यांच्या आई-वडिलांपासून वेगळे करण्यात आले. 

Web Title: Trump Remove Immigrants Policy