कुमारस्वामी सरकार जाणार की राहणार? 'या' दिवशी ठरणार

कुमारस्वामी सरकार जाणार की राहणार? 'या' दिवशी ठरणार

बंगळुरू- आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेले राजकीय नाट्य अखेर आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश विधानसभाध्यक्षांनी दिले आहेत.

कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध करण्याची तारीख ठरली असून दिनांक 18 जुलै रोजी कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कर्नाटकात सत्ता स्थापनेपासून अस्थिरतेच्या भोवऱ्यात अडकलेले सरकार वाचविण्यासाठी जनता दल (एस) आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. यात बंडखोरांपैकी दोन आमदारांची समजूत काढण्यास काँग्रेसला यश मिळाले आहे. मात्र, काही आमदार आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. तसेच, या बंडखोर आमदारांनी काँग्रेस नेत्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com