डोकलाममध्ये चीनने उभारले बोगदे 

डोकलाममध्ये चीनने उभारले बोगदे 

नवी दिल्ली - डोकलाम येथे रस्तेबांधणीच्या कामाला चीनने वेग आणला असून सर्व प्रकारच्या वातावरणात या प्रदेशात दळणवळण सुरु रहावे, यासाठी चीनचे प्रयत्न सुरु असल्याचे ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या हाती लागलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून दिसून येत आहे. चीनने या भागात रस्त्यांवर बोगदे बांधल्याचे दिसत आहे. डोकलाम येथील चीनच्या घुसखोरीनंतरच २०१७ मध्ये भारताबरोबर ७० दिवस तणाव निर्माण झाला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑगस्ट २०१९ मधील या छायाचित्रांमध्ये अतिउंचीवरील ‘मेरुग ला’ खिंडीकडे जाण्याच्या मार्गावरील काही भाग बोगद्यांद्वारे सुरक्षित करण्यात आला असल्याचे आढळून आले होते. गेल्या महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून या बोगद्याची लांबी अर्धा किलोमीटरने वाढविल्याचे दिसून आले आहे. भारताबरोबरील वादानंतर चीनने डोकलामकडे कोणत्याही वातावरणात जाता यावे, यासाठी वेगवान हालचाली सुरु केल्याचे सिद्ध होत असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले. हिवाळ्याच्या काळात डोकलामचे पठार पूर्णपणे बर्फाच्छादित असते. या पठारावर भारत आणि चीन या दोघांचा दावा आहे. २०१७ मध्ये भारताने या भागातील चीनचे बांधकाम रोखले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर सज्ज झाले होते. हा तणाव तब्बल ७० दिवस होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु असतानाच चीनच्या डोकलाममधील हालचालीही उघड झाल्या आहेत. लष्करी चर्चेच्या आठ फेऱ्या होऊनही लडाखमधील वादावर तोडगा निघालेला नाही. दोन्ही देशांमध्ये वरीष्ठ राजकीय पातळीवर चर्चा होऊन त्यात सैन्य माघारीचा निर्णय होऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता डोकलामध्येही दळणवळण सुरक्षित करण्याची त्यांची तयारी सुरु आहे. डोकलाममधील साध्या रस्त्याचे रुपांतर आता डांबरी रस्त्यात झाले आहे. भारतानेही सीमेनजीक रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे काम वेगाने सुरु केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com