'व्हॅन- ट्रक'च्या अपघातात बारा ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : भरधाव वेगातील व्हॅनने आज सकाळी समोरून येणाऱ्या ट्रकला दिलेल्या धडकेत बारा प्रवासी ठार झाले तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 वर ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातानंतर दु:ख व्यक्त केले असून, जखमींना तातडीने मदत देण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. व्हॅनचा चालक अनुप अवस्थी (वय 25) त्याचा मदतनीस किशन याच्यासह नऊजण घटनास्थळीच मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Twelve people were killed in the Van-truck crash