पाक आकारणार वीस डॉलर शुल्क

पीटीआय
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचा दिवस उद्यावर (ता. ९) येऊन ठेपला असतानाही पाकिस्तानकडून शीख भाविकांना प्रवेश देण्यावरून अद्यापही घोळ घालणे सुरूच आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी प्रत्येक भाविकाकडून २० डॉलर शुल्क घेणार असल्याचे पाकिस्तानने आज भारताला कळविले आहे.

नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्‌घाटनाचा दिवस उद्यावर (ता. ९) येऊन ठेपला असतानाही पाकिस्तानकडून शीख भाविकांना प्रवेश देण्यावरून अद्यापही घोळ घालणे सुरूच आहे. कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करण्यासाठी प्रत्येक भाविकाकडून २० डॉलर शुल्क घेणार असल्याचे पाकिस्तानने आज भारताला कळविले आहे. 

कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहेब येथे दर्शनाला येणाऱ्या शीख भाविकांकडे केवळ ओळखपत्र असले तरी चालेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितल्यावर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने ‘पासपोर्ट’ आवश्‍यक असल्याचे कळविले होते. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनीच कर्तारपूर कॉरिडॉरचा वापर करणाऱ्या भाविकांकडून कोणतेही शुल्क घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र, पाकिस्तानने उद्‌घाटनाच्या दिवशी वीस डॉलर शुल्क आकारणार असल्याचे कळविले आहे. भारताने या शुल्क आकारणीला विरोध केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty dollar fee by pakistan for kartarpur corridor opening