मोठी बातमी : चीन सीमेवर 20 भारतीय जवान हुतात्मा; चीनचे 43 मारले!

टीम ई-सकाळ
Tuesday, 16 June 2020

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने आले होते. तणावाची स्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चाही सुरू होती.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषेवरील तणाव टोकाला गेला असून, दोन्ही देशांतील जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्याची माहिती मिळत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील चीनसीमेवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणाव सुरू होता. दरम्यान, भारतीय जवानांनी चीनचे 43 सैनिक मारल्याची माहिती आहे.

देशभरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने आले होते. तणावाची स्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चाही सुरू होती. परंतु, त्या चर्चेनंतरच हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. देशाची अखंडता आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य ठामपणे कटिबद्ध आहे, असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार चीनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडल्यामुळं हा प्रकार घडला आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर असलेल्या या भूभागात शून्यापेक्षा खाली तापमान असताना ही चकमक घडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty indian soldiers martyred china border galwan valley