ModiWithAkshay नरेंद्र मोदींच्या कोपरखळीवर ट्विंकल म्हणाली...

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मोदींच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडत असताना मोदींनी अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकलवर कोपरखळी केली.

अक्षय कुमारने मुलाखतीदरम्यान मोदींना विविध प्रश्न विचारले. मोदींनीही प्रश्नांची उत्तर मोकळेपणाने दिली. अक्षय कुमारने सोशल मीडियाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मोदींनी गमतीशीर पद्धतीने उत्तर दिले. मी ट्विटरवर सक्रीय असतो आणि तुमची पत्नी ट्विंकल खन्ना यांचेही ट्विट मी वाचतो. कधी-कधी मला वाटते की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात, त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे. माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, अशी कोपरखळी मोदींनी अक्षय-ट्विंकलला मारली.

मोदींच्या कोपरखळीवर ट्विंकल खन्नाने प्रतिक्रिया दिली. ट्विंकल ट्विटरवर म्हणाली, 'पंतप्रधानांना फक्त माझ्याविषयी माहिती नसून ते माझे लिखाणसुद्धा वाचतात, याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून बघते.' अस ट्विट तिने केले.

Web Title: twinkle khanna reply on pm narendra modi interview with akshay kumar