निर्मलाताई नशीब तुम्ही पाणीतरी पिता, नाहीतर...

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

निर्मलाताई नशीब तुम्ही पाणी तरी पिता नाहीतर आम्हा सांडपाणी प्यायला लावलं असतं, तुम्ही कांदा खात नाही पण अर्थव्यवस्था सगळी खाऊन टाकली आहे, अशा शब्दांत काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

दिल्ली : सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. गल्ली ते दिल्ली सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किंमतींचीच चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देता-देता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘काळजी करु नका, मी कांदा-लसूण फार नाही खात’ उत्तर दिलं आहे. त्यामुळेच सोशल मीडियातून आता त्याच्यावर सडकून टीका कऱण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले प्रश्न मोदी सरकारला विचारत आहेत. अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरु असताना सुप्रिया सुळेंनी मुद्रा योजना आणि कांद्याच्या वाढत्या किमती यांचा मुद्दा उपस्थित केला. 

सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री निर्मला सीतारमन उठल्या, तेव्हा एका खासदाराने ‘तुम्ही कांदा खाता का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘मी इतका लसूण, कांदा खात नाही हो, काळजी करु नका, मी अशा कुटुंबातील आहे, जिथे कांदा लसूण यांना फारसं महत्त्व नाही’ असं सीतारमन  म्हणाल्या. मात्र, त्यांनी असे उत्तर देऊन सर्वसामन्य नागरिकांचे हसू केल्याचा सूर आता सर्वत्र उमटू लागला आहे. 

शिवसेनेला मोठा झटका; एकसोबत 400 जणांचा भाजपत प्रवेश

निर्मलाताई नशीब तुम्ही पाणी तरी पिता नाहीतर आम्हा सांडपाणी प्यायला लावलं असतं, तुम्ही कांदा खात नाही पण अर्थव्यवस्था सगळी खाऊन टाकली आहे, अशा शब्दांत काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Nirmala Sitaraman says she doesnt eat onions