'तो' पोलिसांना म्हणाला होता एन्काऊंटर करा अन् झाले तसेच

वृत्तसंस्था
Friday, 6 December 2019

सॉफ्टवेअर इंजिनियर असे आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते, की सर, तुम्हाला या आरोपींना शिक्षा द्यायची असेल, तर त्यांना ज्याठिकाणी ही भयानक घटना घडली होती, तेथे त्यांना न्या. तेथून ते आरोपी नक्की पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि पोलिसांसमोर एन्काऊंटर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. प्लिज एकदा विचार करा.

हैदराबाद : हैदराबादमधील दिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना आरोपींना शिक्षा देण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या ट्विट करत पोलिसांना कशी कारवाई करावी याचे संकेत दिले होते. आज (शुक्रवार) अगदी तशीच पोलिसांनी कारवाई केल्याने आणि हे ट्विटर हँडल गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांबरोबरील चकमकीत मारले गेले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली व पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. राष्ट्रीय महामार्ग 44 जवळ ही घटना घडली. घटनास्थळी क्राईम सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यावेळी घटनास्थळावरून जाण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार केला. तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळण्यात आला होता.

या महिला डॉक्टरवर 28 नोव्हेंबरला चार जणांनी हे कृत्य केल्यानंतर konafanclub या नावाने ट्विटरवर अकाउंट असलेल्या व्यक्तीने 1 डिसेंबरला आज घडलेल्या घटनेप्रमाणे ट्विट केले होते. सॉफ्टवेअर इंजिनियर असे आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते, की सर, तुम्हाला या आरोपींना शिक्षा द्यायची असेल, तर त्यांना ज्याठिकाणी ही भयानक घटना घडली होती, तेथे त्यांना न्या. तेथून ते आरोपी नक्की पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि पोलिसांसमोर एन्काऊंटर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. प्लिज एकदा विचार करा.

Image may contain: 1 person, smiling

हैदराबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद : उज्वल निकम

आजचे एन्काउंटर पाहिले तर अगदी हुबेहूब असाच प्रकार याठिकाणी घडल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्यक्तीचे ट्विटर अकाउंट सध्या गायब झाले असून, या अकाउंटवर एकही ट्विट दिसत नाही. त्यामुळे हे ट्विट नक्की कोणी केले होते आणि घडलेल्या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पण, आज खऱ्या अर्थाने या डॉक्टर तरूणीला न्याय मिळाला अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Twitter handle had told to encounter accused of hyderabad rape case on 1st december