टि्वटरचा पासवर्ड बदला ; कंपनीकडून प्रसिद्धीपत्रक जारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

ट्विटरने आपल्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रकही कंपनीकडून जारी करण्यात आले आहे. टि्वटरवर स्टोअर केलेल्या पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळला आहे.

नवी दिल्ली : व्हॉटस्अप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियापैकी एक असलेल्या ट्विटरने आपल्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रकही कंपनीकडून जारी करण्यात आले आहे. टि्वटरवर स्टोअर केलेल्या पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून टि्वटरच्या 33 कोटी युजर्सला ट्विटरने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे. 

twitter hack

याशिवाय पासवर्ड बदलण्याच्या केलेल्या आवाहनसोबत इंटरनल लॉगमध्ये बग आढळलेल्या बगवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ट्विटरने दिली. मात्र, आतापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा गैरवापर झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून युजर्सनी स्टोअर्ड पासवर्ड त्वरित बदलावा, असे आवाहन ट्विटरकडून करण्यात आले आहे. फक्त सुरक्षेचा उपाय म्हणून टि्वटरने आपल्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: Twitter Warns 336 Million Users to Change Their Passwords