गुजरातमध्ये पाच वर्षाच्या दोन मुलींवर बलात्कार

file photo
file photo

सुरतः गुजरातमध्ये पाच वर्षांच्या दोन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी (ता. 30) घडली आहे, अशी माहिती दिंडोली पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवा गाम भागात घराबाहेर खेळत असलेल्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी रोशन उर्फ कालू भूमिहार (वय 19) याला अटक करण्यात आली आहे. दुसऱया घटनेत मोदी इस्टेट जवळ एका मुलीला अज्ञाताने उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.

पहिल्या घटनेत मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर 150 पोलिस मुलीचा शोध घेत होते. घटनास्थळी पीडित मुलगी विव्हळत पडली होती. योग्य वेळी पोलिस घटनास्थळी पोहचले नसते तर मुलीचा जीव वाचला नसता. दुसऱया घटनेत अज्ञात व्यक्तीने झोपलेल्या मुलीला उपलून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित रस्त्याने रडत येत होती. यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. या मुलीचे वडील मजूरीचे काम करतात. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com