बंगळूरमध्ये दोन सूर्यकिरण विमानांची हवेत धडक

Two aircraft of the Surya Kiran Aerobatics Team crash at the Yelahanka airbase in Bengaluru
Two aircraft of the Surya Kiran Aerobatics Team crash at the Yelahanka airbase in Bengaluru

बंगळूरः हवाई दलाने आज (मंगळवार) एअर शोचे आयोजन केले होते. यावेळी प्रात्यक्षिक सादर करत असताना दोन सूर्यकिरण विमाने हवेत एकमेकांना धडकली. वैमानिकांनी प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरल्याने ते सुखरूप बचावले आहेत.

दोन्ही विमाने हवेत असतानाच त्यांची एकमेकांशी टक्कर झाली. अपघातादरम्यान दोन्ही वैमानिकांना पॅराशूटच्या सहाय्याने सुरक्षितरीत्या बाहेर येण्यात यश आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विमानांचे किती नुकसान झाले हे अद्याप समजलेले नाही. यालहंका एअरबेसवर उद्यापासून एअर शोला सुरुवात होणार आहे. हा थरार 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूत अनुभवता येणार आहे. त्याच्या एक दिवस आधी प्रात्यक्षिक सादर करत असतानाच या विमानांचा अपघात झाला.

सूर्यकिरण ही भारतीय हवाई दलातील एक तुकडी असून, या विमानांचा वापर हवाई कसरतींसाठी केला जातो. 1996 ते 2011 दरम्यान या विमानांचा वापर केला गेला. यानंतर 2015 मध्ये या विमानांमध्ये दुरुस्ती करुन त्यांचा पुन्हा वापर सुरु झाला. सध्या या ताफ्यात सध्या नऊ विमाने आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com