अरूणाचलप्रदेशमध्ये लष्कराचे 2 जवान तब्बल 14 दिवसांपासून बेपत्ता

हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंग राणा असं या दोन जवानांचं नाव आहे.
Army
ArmySakal

नवी दिल्ली : अरूणाचलप्रदेशमध्ये लष्कराचे दोन जवान गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंग राणा असं या दोन जवानांचं नाव आहे. 28 मे रोजी ते बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

(2 soldiers Missing In Arunachal Pradesh)

प्रकाश सिंग राणा यांच्या पत्नीने माध्यमाला बोलताना सांगितलं की, "29 मे ला लष्करांच्या अधिकाऱ्याकडून मला फोन आला आणि 28 मे रोजी माझा पती बेपत्ता झाल्याचं त्यांनी मला सांगितलं." असं राणा यांच्या पत्नी ममता यांनी सांगितलं आहे. दरम्यान "9 जूनला दुसरा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दोघेही जवान नदीच्या पाण्यात पडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता." असं ममता बोलताना म्हणाल्या.

Army
'ज्यांनी गद्दारी केली, त्यांची यादी आमच्याकडे... पाहून घेऊ!'

दरम्यान हरेंद्र नेगी यांच्या पत्नी पूनम नेगी यांनी सांगितलं की, "दोन्ही सैनिक नदीजवळ गेले होते हे कुणालाच माहिती नाही, हे विश्वास ठेवण्यासारखं नाही." असं पूनम नेगी यांनी सांगितलं आहे. पुढे काय झाले ते लष्कराने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. हरेंद्र नेगी आणि त्यांची पत्नी पूनम नेगी यांचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना सध्या एका वर्षाचं बाळ असल्याची माहिती सांगितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com