बिहारमध्ये राज्यराणी एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

या दुर्घटनेमुळे साहरसा-मानसी आणि साहरसा-माधेपुरा या गाड्या उशीराने धावत आहेत. तर, अनेक गाड्यांचे वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

पाटणा - बिहारमध्ये साहरसा-पाटणा या राज्यराणी एक्स्प्रेसचे दोन डबे आज (रविवार) रुळावरून घसरले. या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

सहरसा स्टेशनचे अधीक्षक नवीनचंद्र यादव यांनी सांगितले, की या दुर्घटनेमुळे साहरसा-मानसी आणि साहरसा-माधेपुरा या गाड्या उशीराने धावत आहेत. तर, अनेक गाड्यांचे वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. तांत्रिक कारणामुळे हे दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

शुक्रवारीही कर्नाटकमध्ये औरंगाबाद-हैदाराबाद पॅसेंजरचे तीन डबे रुळावरून घसरले होते. आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेची दुर्घटना झाली आहे. सुदैवाने या दोन्ही अपघातात जिवीतहानी झालेली नाही.

Web Title: Two bogies Saharsa-Patna Rajya Rani Express train derail in Bihar