मुलांच्या निरागसपणाचे सोशल मीडियावर कौतुक...

two boys first aid to injured dog photo viral
two boys first aid to injured dog photo viral

नवी दिल्ली: एका जखमी श्वानावर दोन मुले उपचार करत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. नेटिझन्स त्यांच्या निरागसपणाचे कौतुक करत आहेत. एका बाजूला युवक श्वानावर अत्याचार करत आहेत, तर दुसरीकडे दोन मुले निरागसपणे उपचार करत असल्याचे पाहायला मिळते.

सोशल मीडियावर माणुसकीची जाणीव करून देणारे अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर दोन मुलांचे छायाचित्र व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये दोन लहान मुले श्वानाच्या जखमेवर तात्पुरते उपचार करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या रंगाचे पट्ट्या कुत्र्याच्या जखमेवर लावत आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही मुलांच्या निरागसपणाचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर @Imamofpeace नावाच्या युजरने संबंधित छायाचित्र शेअर केले आहे. 'दोन भारतीय राजे' असे शीर्षक त्यांनी या छायाचित्राला दिले आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून मुलांचे कौतुक करत आहेत.

दरम्यन, दुसऱया एका घटनेत एका युवकाने श्वानाच्या मागील दोन्ही पायांना पकडून गरागरा फिरून जोरात फेकून दिले. यावेळी श्वान विव्हळत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्राणी मित्र संघटनेने कारवाईची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com