सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांची आत्महत्या 

पीटीआय
गुरुवार, 7 जून 2018

सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.
 

जैसलमेर - सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांनी आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.

सीमा सुरक्षा दलाच्या 56 व्या बटालियनचा जवान डी. के. तामटा याने आपल्या बंदुकीतून मंगळवारी स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्‌याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

तामटा हा उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे.आत्महत्येपूर्वी तो आपल्या कुटुंबीयांसमवेत फोनवर बोलला होता त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले. अन्य एका घटनेत हवालदार जोगेंदर सिंग याने स्टोअरमध्ये आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Two BSF men commit suicide in Jaisalmer