‘सायकल’ दोस्तीची दुःखदायी अखेर

‘सायकल’ दोस्तीची दुःखदायी अखेर

बेळगाव - कळत्या वयापासून त्या दोघांची दोस्ती... आधी हिंडलगा हायस्कूलला दोघे एकत्र शिकायचे... एक गल्ली सोडून दोघांचे घर... दोघेही हुशार असल्याने त्यांना दुसऱ्या शाळेत पाठवायचे ठरले.... दोघांच्या शाळा वेगळ्या पण जायची वाट एकच... त्यामुळे दोघांचीही एकाच सायकलीवरून ये-जा... शनिवारी शाळेतून आल्यानंतर पोहायलाही त्याच सायकलीवरून गेले... परंतु, काळ बनून प्रतीक्षा करणाऱ्या तलावाने त्यांना गिळंकृत केले. त्यांच्या यारीची ही अखेर सर्वांनाच चटका लावणारी ठरली.

ज्योतीनगरमधील रोहन भारत खोरागडे (वय १५) व अंश अनंत शिंदे (१५) यांची आधीपासून मैत्री. रोहन हा बेननस्मिथ हायस्कूलला तर अंश सरदार्समध्ये शिकत होता. आठवीपर्यंत हिंडलगा हायस्कूलमध्ये शिकल्यानंतर ७० टक्‍क्‍यांपुढे गुण घेणाऱ्या या गुणी पोरांना ऐपत नसताना पालकांनी चांगल्या शाळेत घातले. 

सायकलवरून जमलेली गट्टी हायस्कूल बदलले म्हणून तुटली नाही. अंश रोहनला न चुकता त्याच्या सायकलीवर घ्यायचा. त्याला बेननस्मिथमध्ये सोडून पुढे सरदार्स हायस्कूलला जायचा.

पोहण्याचा आनंद नडला 
क्रिकेट असो, गल्लीत गोट्या किंवा अन्य खेळ खेळणे असो रोहन व अंश नेहमीच एकत्र दिसायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटली. दुपारी घरी येऊन जेवण केले. आईच्या सांगण्यावरून पाणी भरले व झाडलोटही केली. त्यानंतर खेळायला जातो, असे सांगून दोघे बाहेर पडले. त्यानंतर ते हिंडलग्यातील कलमेश्‍वर मंदिर परिसर तलावाकडे पोहण्यास गेले. आडबाजूला असलेल्या या तलावात ते उतरले खरे; परंतु पक्के पोहता येत नसल्यामुळे ते बुडाल्याचा संशय आहे. 

सायकलही गायब
तलावापर्यंत वाहन अथवा सायकल जात नाही. तर ते बाहेर लावून पायवाटेने आत जावे लागते. दोघे मित्र सायकल रस्त्यावर लावून पोहायला गेले. दोन दिवस रस्त्यावरच राहिलेली सायकलही कुणीतरी लांबविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com