कर्नाटकात मिशन भाजप सरकार? काँग्रेसच्या दोन आमदारांचे राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेत येऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. आनंद सिंग (विजयनगर) आणि रमेश जरकीहोळी (गोकाक) या काँग्रेसच्या दोन आमदारांनी सोमवारी लागोपाठ आमदारकीचे राजीनामे दिल्याने कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेस आघाडी सरकारचे बहुमत अवघ्या तीनवर आले.

बंगळुरू : कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेत येऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. आनंद सिंग (विजयनगर) आणि रमेश जरकीहोळी (गोकाक) या काँग्रेसच्या दोन आमदारांनी सोमवारी लागोपाठ आमदारकीचे राजीनामे दिल्याने कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेस आघाडी सरकारचे बहुमत अवघ्या तीनवर आले.

राजीनामा दिलेले दोन्ही आमदार भाजपमध्ये जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाराज असलेले काँग्रेसचे आणखी सहा आमदार पक्ष आणि पद सोडण्याच्या विचारात असल्याचेही बोलले जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 225 पैकी 105 जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांना सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी 77 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने 37 जागा जिंकणाणाऱ्या जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊन आघाडी सरकार स्थापन केले होते.

बसपचा व एक अपक्ष आमदार सोबत घेऊन 119 आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते. मात्र, उमेश जाधव यांनी दिलेला राजीनामा गृहित धरला तर सोमवारच्या दोन राजीनाम्यांनी सरकारचे बहुमत अता अवघ्या तीनवर आले आहे. दरम्यान, भाजपचे नेते बी. एस. येदियुरप्पा म्हणाले की, काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या मीही वाचल्या. आम्ही हे सरकार पाडणार नाही. मात्र सरकार स्वत:हून पडले तर आम्ही पर्यायी सरकार स्थापनेच्या शक्यतेवर विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून कर्नाटकात मिशन भाजप सरकार सुरु असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Congress MLAs send resignations in Karnataka