अथणीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

अथणी - कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अथणी तालुक्‍यातील हुलगबाळी आणि हल्याळ येथे घडली. संजय बसय्या मठद (वय ४५, रा. हल्याळ) आणि हणमंत भुताली नाईक (३२, रा. हुलगबाळी) अशी त्यांची नावे आहेत. 

संजय मठद यांचे पीकेपीएस संघात ७० हजार, एम. जी. बॅंकेत एक लाख ५० हजार आणि उसनवारी दोन लाख रुपये असे चार लाख २० हजारांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून मठद यांनी मळ्यातील पत्र्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मठद यांची दोन एकर जमीन असून, ती पाण्यामुळे खराब झाली आहे. त्यामुळे कर्ज फेडणे अशक्‍य झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अथणी पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. 

हुलगबाळी येथील नाईक यांची एक एकर जमीन असून, त्यावर अथणी शहरातील विविध बॅंका व सोसायटीचे पाच लाख ७० हजारांचे कर्ज होते. पीक न आल्याने वेळेत कर्ज फेडणे कठीण झाले. त्यामुळे अखेर नाईक यांनी आत्महत्या केली. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Two Farmers suicide in Athani

टॅग्स