जम्मू-काश्मीरच्या सिमाभागात पाकिस्तानी विमानांचे उड्डाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भारत पाकिस्तान सिमेला जोडून असलेल्या पूंछ सेक्टर भागात मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या दोन लढावू विमानांनी उड्डाण केल्याची घटना घडली. नियंत्रण रेषेपासून केवळ दहा किलोमिटर च्या अंतरावरून विमानांचे उड्डाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी भारतीय हवाई दल पाकिस्तानातील प्रत्येक हालचालिवर बारीक लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले जात आहे.
 
अचानक आलेल्या या विमानांच्या आवाजामुळे या परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान मधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाची दोन विमाने भारतीय सिमेत आले होते. परंतु, आपल्या हवाई दलाने त्यांना पळवून लावले होते. काल रात्री पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या रडारने टिपले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two Fighter plane of Pakista takeoff in border area in Jammu and Kashmir