Video: एका बॉयफ्रेंडसाठी दोघींचा भर रस्त्यात राडा, एकमेकींना चांगलचं हाणलं | Viral Post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: एका बॉयफ्रेंडसाठी दोघींचा भर रस्त्यात राडा, एकमेकींना चांगलचं हाणलं

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसंबंधी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील पण सध्या एक मजेशीर पण थक्क करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

या सदर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोन तरुणी भर रस्त्यात एकमेकींवर भिडल्या आहेत. यामागील कारण ऐकाल तर तुम्ही शॉक होणार. या दोन तरुणी चक्क एका बॉयफ्रेंडसाठी एकमेकांसोबत भांडताहेत. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

हेही वाचा: Viral Video : पूनम पांडेने जीभ काढून दिली सिग्नेचर स्टेप; ड्रेस केला ॲडजेस्ट

व्हिडिओत दिसते की या दोन मुली फक्त भांडतच नाही तर एकमेकांचे केस ओढत एकमेकांना हाणताहेत. हा सर्व प्रकार व्हिडिओत दिसून येतोय. या दोघींचे भांडण सोडवण्याचा बाकीच्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांचे भांडण इतक्या उग्र स्वरुपाचे होते की त्यांना मागे यावं लागलं.

हेही वाचा: Viral Video : श्रीमंतीच्या विधानावरून काजोल ट्रोल; युजर्सने म्हटले अहंकारी अन्...

बऱ्याच वेळ मुली भांडत होत्या पण काही काळानंतर त्या शांत झाल्या. त्यांना भांडताना पाहून तेथील बाकी मुलं मुली व्हिडिओत हसताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडिओ बिहारचं असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Two Girlfriend Fight With Each Other On A Road For A Boyfriend Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..