शुभमंगल म्हणताच अवतरली गर्लफ्रेंड अन् केला दोघींशी विवाह

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

दोन्ही युवतींनी एक पती स्विकारण्याचा निर्णय घेतला आणि तिघांचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.

रायपूर : छत्तीसगडमध्ये एका आगळ्या-वेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. शुभमंगल सावधान म्हणताच नवरदेवाची गर्लफ्रेंड अवतरली अन् शांतता पसरली. परंतु, एकाचवेळी दोघींशी विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् झाला सुद्धा.

दंतेवाडामधील मुचनार गावात हा अनोखा विवाह पार पडला आहे. बीरबल नाग नावाच्या नवरदेवाचा प्रतिभाशी विवाह लावण्यात येत होता. विवाहादरम्यान अचानक सुमनी नावाच्या युवतीने घटनास्थळी आली अन् माझे बीरबलवर प्रेम असल्याचे सांगू लागली. काही क्षणातच शांततता पसरली. कोणाला काय करावे समजेनासे झाले. सुमनी आणि बिरबलचे एकमेकांवर प्रेम असल्याचे समजले. हाणामारी, गोंधळ, भांडण न करता परिस्थिती समजून घेण्यात आली. हल्बा समाजाच्या नागरिकांनी आणि कुटुंबियांनी समजुतदारपणाची बाजू घेऊन बिरबल, प्रतिभा आणि सुमनी या तिघांच विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. मोठ्या उत्साहात एक नवरा मुलगा आणि दोन नवऱयांचा विवाह पार पडला.

बिरबल आणि सुमनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनाही लग्न करायचं होते. परंतु, घरच्यांचा दोघांच्या विवाहाला विरोध होता. काही दिवसांनी सुमनी तिच्या घरी परत गेली. तिने परत येण्यासही नकार दिला होता. दोन वर्षांनी बिरबल हा प्रतिभा नावाच्या तरुणीसोबत युवतीसोबत विवाह करण्यास तयार झाला. पुढे काही दिवसांत विवाहाची तयारी सुरू झाली अन् विवाहसुद्धा सुरू झाला.

विवाहस्थळी सुमनी अचानक आल्यामुळे प्रकरण पोलिसांकडे गेले होते. पोलिस स्टेशनमध्ये दोन युवती आणि बिरबलच्या परिवारातील सदस्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही युवतींनी एक पती स्विकारण्याचा निर्णय घेतला. शिवाय, समाजाच्या प्रमुखांनीही होकार दिला आणि तिघांचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.

मुलाचे वडील म्हणाले की, 'विवाहाबाबत आमची काही तक्रार नाही. मुलगा आणि त्याच्या दोन्ही पत्नी खूश आहेत. दोन्ही मुलींकडील नातेवाईकही खूश आहेत. घरात सुख-शांती रहावी एवढीच अपेक्षा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls married one man in Chhattisgarh