MP : हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १२ मुली पोलिसांच्या ताब्यात

या संबंधित हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
Sex racket
Sex racketsakal

गेल्या २४ तासांत दोन हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी भंवरकुआन पोलिस स्टेशन हद्दीतील नवलखा परिसरात ६ मुली आणि ३ तरुणांसह ९ जणांना अटक करण्यात आली. घटनेसंदर्भात रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून एका हॉटेलमधून ६ मुली आणि ६ तरुणांना अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, या संबंधित हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान काही लोक नशाही करत असल्याचे समजले होते. छाप्यादरम्यान पोलिसांनी ईशान्य, बिहार आणि इंदूरमधील मुलींना अटक केली असून हॉटेल मालक आणि व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली आहे.

Sex racket
पक्ष चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश

या घटनेसंदर्भात अतिरिक्त डीसीपी प्रशांत चौबेंनी सांगितले, पोलिसांना भंवरकुआन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिसांनी तेथे छापा टाकून हॉटेल मालक, व्यवस्थापक, ६ मुली आणि इतरांना अटक केली. या आरोपींची पोलिस चौकशी करत असून इतर तथ्ये गोळा केली जात आहेत.

पुनीत गौर याने हॉटेल भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या एक वर्षापासून तो हॉटेल चालवत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू आहे. पोलिस निवेदनाची सत्यता पडताळून पाहण्यात व्यस्त आहेत. अटक करण्यात आलेल्या काही मुली बिहार आणि ईशान्येतील आहेत, अशी माहिती हॉटेलमधील अवैध कामांबाबत व्यवस्थापकाने दिली आहे.

Sex racket
कँडी खाण्याच्या बदल्यात 61 लाखांचा पगार, 5 वर्षांची मुलंही करू शकतात अर्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com