काश्‍मीरमध्ये दोनशे दहशतवादी सक्रिय

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये सुमारे दोनशे दहशतवादी सक्रिय असून, त्यात चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत सुमारे 105 दहशतवाद्यांनी भाराज्यात प्रवेश केल्याची माहिती आज सरकारच्या वतीने देण्यात आली.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये सुमारे दोनशे दहशतवादी सक्रिय असून, त्यात चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत सुमारे 105 दहशतवाद्यांनी भाराज्यात प्रवेश केल्याची माहिती आज सरकारच्या वतीने देण्यात आली.

राज्यसभेत एका लिखित उत्तरात बोलताना गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले, की मिळालेल्या माहितीनुसार काश्‍मीरमध्ये 200 दहशतवादी आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारचे सहकार्य घेत सीमेवरून होणारी घुसखोरी थांबविण्याचे प्रयत्न केले जात आहत्त. गेल्या दोन वर्षांत काश्‍मीर खोऱ्यात कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात दोन हजारांहून अधिक घटना झाल्या आहेत. त्यात 627 घटना बारामुल्ला, 507 घटना श्रीनगरमध्ये, 302 घटना पुलवामात आणि 261 घटना अनंतनाग येथे झाल्या आहेत.

Web Title: two hundered terrorist active in kashmir