गोहत्येच्या संशयावरुन उत्तरप्रदेशात जाळपोळ; पोलिसासह दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरुन मोठा भडका उडाला असून यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अवैध कत्तलखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी येथील पोलिस स्थानकाला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नंतर एका पोलिस व्हॅनलाही येथे आग लावण्यात आली.

लखनौ- उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरुन मोठा भडका उडाला असून यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अवैध कत्तलखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी येथील पोलिस स्थानकाला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नंतर एका पोलिस व्हॅनलाही येथे आग लावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गावातील शेतामध्ये गोमांस आढळून आल्याने त्याविरोधात लोकांनी आंदोलन पुकारले होते. यादरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर अनियंत्रित जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केला. 

अवैध कत्तलखान्यांविरोधातील आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात पोलिस निरिक्षक सुबोध यांचा मृत्यू झाला असून सध्या इथली परिस्तिथी नियंत्रणात आहे. लोकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केल्याने पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांचा मृत्यू झाला.

Web Title: Two, including police officer, dead after people clash to protest against illegal slaughterhouses