दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत दोन जवान जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

पुलवामाच्या द्राबगम भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाची घेराबंदी करून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दले जवळ येताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र दहशतवाद्यांना शोधून काढण्याची मोहीम अद्यापही सुरूच आहे.

Web Title: Two jawans injured in encounter with militants