दोन काश्‍मिरी विक्रेत्यांना लखनौमध्ये मारहाण 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 मार्च 2019

लखनौ - शहरातील दलिगंज भागात सुकामेव्याची विक्री करणाऱ्या दोन काश्‍मिरी विक्रेत्यांना जमावाने मारहाण केली. याचे चित्रण सीसी टीव्हीवर पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत चार जणांना अटक केली. ही घटना बुधवारी (ता. 6) सायंकाळी घडली. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात विविध भागांत राहणाऱ्या काश्‍मिरी नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. तशीच घटना लखनौमध्ये काल घडली. दालिगंज पुलावर दोन काश्‍मिरी युवक सुकामेवा विकत होते. त्यावेळी जमावाने त्यांना मारहाण केली. ते दगडफेक करणारे होते, असे जमावाचे म्हणणे होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी दिली. एका सजग नागरिकाने या मारहाणीचे व्हिडिओ चित्रण केले होते. त्यामुळे ही घटना उजेडात आली. 

त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले व मुख्य आरोपी बजरंग सोनकर याच्यासह चार जणांना अटक केली. सोनकरवर खून, लुटालूट, चोरी व बेकायदा शस्त्र बाळगणे, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

Web Title: Two Kashmiri vendors beat up in Lucknow