कार दरीत कोसळून दोन ठार 

यूएनआय
शनिवार, 16 जून 2018

टिहरी जिल्ह्यात आज सकाळी कार दरीत कोसळून दिल्लीतील दोन जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे चंबा मसुरी रस्त्यावर हा अपघात झाल्याचे चंबाच्या पोलिस ठाण्याचे प्रमुख देवेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले.

न्यू टिहरी: टिहरी जिल्ह्यात आज सकाळी कार दरीत कोसळून दिल्लीतील दोन जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे चंबा मसुरी रस्त्यावर हा अपघात झाल्याचे चंबाच्या पोलिस ठाण्याचे प्रमुख देवेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले.

धीरेंद्र सिंह (वय 35) आणि विनय कुमार (वय 38) असे मरण पावलेल्यांची नावे असून, ते दिल्लीच्या मायापुरी भागातील रहिवासी आहेत. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. 

Web Title: Two killed in car accident