दिल्लीत मोटार फूटपाथवर चढून अपघात; दोन ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

दिल्लीतील काश्‍मिरी गेट परिसरात एक मोटार पदपथावर चढल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. मोटार चालक हा बारावीचा विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील काश्‍मिरी गेट परिसरात एक मोटार पदपथावर चढल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. मोटार चालक हा बारावीचा विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आज (गुरुवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास "आय-20' मोटार काश्‍मिरी गेट परिसरात जात होती. त्यावेळी मोटार अचानक फूटपाथवर चढली. मोटारीने फूटपाथवरील पाच जणांना धडक दिली. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दिल्लीचे पोलिस उपायुक्त घटना स्थळी पोहोचले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मोटार चालक हा बारावीत शिकणारा विद्यार्थी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत सविस्तर वृत्ताची प्रतिक्षा आहे.

Web Title: Two killed, three injured in Kashmiri gate car accident