PM किसान योजनेत दोन महत्वाचे बदल, जाणून घ्या

Two Major Changes PM Kisan Yojana
Two Major Changes PM Kisan Yojanaesakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी तीन टप्प्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. (Two Major Changes PM Kisan Yojana)

Two Major Changes PM Kisan Yojana
PM किसान योजनेचा दहावा हप्ता जाहीर, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना फायदा?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलला भेट देऊन त्यांच्या हप्त्याबद्दल माहिती मिळू शकत होती. पण, आता पीएम किसान पोर्टलवरील ही माहिती पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतरच तुमच्या हप्त्यासंबंधी सर्व माहिती पाहता येईल.

दुसरा महत्वाचा बदल म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असेल आणि ई-केवायसी अजूनही केले नसेल तर तुम्हाला ११ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १० व्या हप्त्यापर्यतचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. १० व्या हप्त्याचे पैसे १ जानेवारी २०२२ ला शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आले. आता ११ वा हप्ता एप्रिल महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

या लोकांना परत करावी लागेल रक्कम -

शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेसाठी अर्ज करताना चुकीची माहिती भरली असेल तर त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. या योजनेअंतर्गत मिळालेले पैसेही त्यांना परत करावे लागतील. तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तर चुकीची माहिती देऊन चुकूनही नोंदणी करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com