बांगलादेशातून बनावट नोटा आणणाऱ्या दोघांना अटक

पीटीआय
शनिवार, 31 मार्च 2018

बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणलेल्या दोन हजाराच्या बनावट नोटा आज महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्या असून, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

हैदराबाद : बांगलादेशातून तस्करी करून भारतात आणलेल्या दोन हजाराच्या बनावट नोटा आज महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केल्या असून, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

बाजारात याची किमत दहा लाख इतकी होती. विधानसभेची निवडणूक होणाऱ्या कर्नाटकमध्ये या नोटा बदली करण्याचा प्रयत्न होता. कर्नाटकमध्ये येत्या 12 मे रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनमजवळील इस्ट कोस्ट एक्‍स्प्रेसवरून आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींच्या बॅगांची तपासणी केली असता त्यात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांची पाच बंडल सापडले, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. नोटांचे हे बंडल एका कागदामध्ये गुंडाळलेले होते आणि ते बॅगेत ठेवलेले होते. 

Web Title: Two men Arrested for fake note carriing Bangladesh