अनंतनागमध्ये लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 जानेवारी 2018

लष्कराकडून दहशतवाद्यांच्या शोधार्थ मोहिम राबविण्यात येत असताना दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरार्थ जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अद्यापी कळू शकलेली नाहीत

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत सुरक्षा दलांनी आज (मंगळवार) दोन दहशतवाद्यांना ठार केले.

अनंतनागमधील कोकेरनाग या भागामध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांच्या शोधार्थ मोहिम राबविण्यात येत असताना दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरार्थ जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अद्यापी कळू शकलेली नाहीत.

Web Title: Two militants killed in Anantnag encounter