काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील बंदीपूरा जिल्ह्यातील हजीन भागामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजीन भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज सकाळी हजिन भागामध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी अद्यापही शोध मोहिम सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two militants killed in Bandipora encounter at jammu kashmir