शोपियाँमध्ये गोळीबार ; दोन दहशतवाद्यांचा खातमा

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

शोपियाँमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत 2 दहशवाद्यांचा खातमा करण्यात यश आले. मात्र, यातील ठार झालेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह अद्यापही मिळाला नाही. सध्या या परिसरात अद्यापही चकमक सुरुच आहे.

जम्मू : जम्मू काश्मीरच्या शोपियाँमध्ये भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (मंगळवार) चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात जवानांना यश आले. मात्र, या चकमकीत 6 जण जखमी झाले. ही चकमक कुंदलन गावात झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शोपियाँमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत 2 दहशवाद्यांचा खातमा करण्यात यश आले. मात्र, यातील ठार झालेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह अद्यापही मिळाला नाही. सध्या या परिसरात अद्यापही चकमक सुरुच आहे. मात्र, यामध्ये चार नागरिक आणि 44 राष्ट्रीय रायफल्सचे 2 सैनिक जखमी झाले असून, यामध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे.  

या जखमी झालेल्या जवानांना श्रीनगरच्या लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर जखमी झालेल्या नागरिकांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Two militants killed four civilians injured in gunfight in Jammu Kashmir