दोन आमदार फुटले तरी युतीलाच पाठींबा  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मडगाव : महाराष्ट्र गोमंतक (मगो) पक्षात फूट पडून दोन आमदारांनी भाजपात केलेला प्रवेश व त्यानंतर मगोचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले. मात्र, तरिही मगोने भाजपप्रणित युती सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनीच ही माहिती मडगावात पत्रकार परिषदेत स्पष्ट केली असून भाजप प्रणित युती सरकारचा पाठिंबा काढून न घेण्याच्या मगोच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

मगोने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून मगोच्या या निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे सावंत यांनी सांगितले. सुदीन ढवळीकर हे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. अनेक वर्षे ते राजकारणात आहेत. त्यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. लोकसभा निवडणूकही न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ढवळीकर हे द्रष्टे नेते आहेत, असे सावंत यांनी सांगितले. 

खाण प्रश्नावर त्यांनी केलेले वक्तव्य हे राजकीय स्वरुपााचे आहे. मगो हा राजकीय पक्ष आहे. पक्षाच्या नेत्याची राजकीय भूमिका असते. त्यानुसार ढवळीकर यांनी खाण विषयावर आपले मत मांडले आहे. पण, खाण प्रश्नावर भाजपकडून होणाऱ्या प्रयत्नांची ढवळीकर यांना पूर्ण जाणीव आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मगोच्या दोन आमदारांनीच भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना सरकारात सामावून घेण्यासाठी ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गोवा फाॅरवर्डशी संबंध भक्कम
उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्या गोवा फाॅरवर्ड पक्षाकडे भाजपचे संबंध भक्कम असून गोवा फाॅरवर्डच्या कोणत्याही आमदारांना भाजपात घेण्यात येणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत गोवा फाॅरवर्ड पक्ष भाजपला साथ देत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: two MLA split but party support for BJP allince