राजीव गांधीनी आयएनएस विराटचा वापर केला- माजी नौसेना अधिकारी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर 'वैयक्तिक टॅक्सी' म्हणून वापरल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला भारतीय नौसेनेच्या माजी अधिकाऱ्यांचा दुजोरा

माजी नौदल कमांडर व्ही. के. जेटली (सेवानिवृत्त) यांनी ट्विट केले आहे की, गांधी कुटुंबियांनी त्यांच्या सुट्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर नौदल संसाधने वापरली आहेत.

नवी दिल्ली: राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर 'वैयक्तिक टॅक्सी' म्हणून वापरल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला भारतीय नौसेनेच्या माजी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. माजी नौसेना अधिकाऱ्यांच्या एका गटाने नरेंद्र मोदींच्या दाव्याचे समर्थन केले आहे. माजी नौदल कमांडर व्ही. के. जेटली (सेवानिवृत्त) यांनी ट्विट केले आहे की, गांधी कुटुंबियांनी त्यांच्या सुट्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर नौदल संसाधने वापरली आहेत.

राजीव आणि सोनिया गांधी यांनी बंगाराम बेटावर त्यांची सुट्टी साजरी करण्यासाठी प्रवास करण्यासाठी आयएनएस विराटचा वापर केला होता. भारतीय नौसेना स्त्रोत मोठ्या प्रमाणावर वापरले गेले होते. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे, त्या वेळी आयएनएस विराटला माझी पोस्टिंग करण्यात आली होती, असे जेटली यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, निवृत्त व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला दावा फेटाळून लावला होता. तसेच गांधी कुटुंबाने आएनएस विक्रांतवर अधिकृत दौऱ्यासाठी हजर होती. मात्र, राजीव गांधींसोबत कुठलेही परदेशी नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक या दौऱ्यावर हजर नव्हते, असे नौदलाचे व्हाईस अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. पसरिचा यांच्या व्हिडीओचा संदर्भ देत मोदीचा दावा खोटा असल्याचं काँग्रसचे प्रवक्ते पवन खेरा यांनीही म्हटले होते. 
 
मोदींचा आरोप बिनबुडाचा : एल. रामदास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two navy veterans back Modi's claim, state Rajiv Gandhi used naval resources after ex-admiral claimed otherwise