दोन कुख्यात नक्षलवाद्यांना अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

झारखंडमध्ये सुशील तर बिहारमध्ये मरांडी जेरबंद

जमशेदपूर : संयुक्त जनता दलाच्या माजी आमदाराच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या नक्षलवाद्यास राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) झारखंडमधील पश्‍चिम सिंहभूम जिल्ह्यातील चौबासा येथून आज अटक केली. सुशील दांगिल ऊर्फ ख्रिस असे अटक झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. दुसरीकडे बिहारमध्ये हर्दियाच्या जंगलातून सशस्त्र सीमा दलाने सुरेश मरांडी या नक्षलवाद्याला अटक केली असून तो येथे दबा धरून बसल्याची माहिती गुप्तचरांनी आधीच दिली होती. मरांडीच्या ताब्यातून पोलिसांनी एक रायफल आणि 112 जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.

दरम्यान झारखंडमधील सुशील हा कधीकाळी पोलिसांना शरण आलेल्या "कुंदन पहान स्क्वाड'चा सदस्य होता. संयुक्त जनता दलाचे आमदार रमेशसिंह मुंडा यांची 2008 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या सात नक्षलवाद्यांमध्ये सुशीलचाही समावेश होता. स्थानिक न्यायालयामध्ये सादर केल्यानंतर "एनआयए'च्या विशेष पथकाने त्याला रांचीला हलविले. मुंडा यांच्या हत्येप्रकरणी झारखंडचे माजीमंत्री गोपालकृष्ण पाटर यांना मागील वर्षीच अटक करण्यात आली होती. पाटर यांनीच मुंडांच्या हत्येची सुपारी नक्षलवाद्यांना दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Web Title: Two Naxals arrested in jharkhand